काय सांगता,डोळ्यांसाठी फायदेशीर आहे गुलाबपाणी

मंगळवार, 23 मार्च 2021 (19:28 IST)
गुलाबपाणीचा वापर त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी करतात .परंतु हे डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे कसे काय जाणून घ्या. 
 
1 गडद मंडळे कमी करतो-हे डोळ्याखालील गडद मंडळे कमी करण्यात मदत करतो. या साठी  एका वाटीत 2 मोठे चमचे थंड दूध आणि 2 मोठे चमचे थंड गुलाब पाणी मिसळून लावा. या मिश्रणामध्ये  कॉटन पॅड भिजत घाला आणि 20 -25 मिनिटे पॅड चेहऱ्यावर तसेच ठेवा. नंतर कॉटन पॅड काढून चेहरा पाण्याने धुऊन घ्या. काहीच वेळात गडद मंडळे कमी होऊ लागतात.     
 
2 डोळे धुण्यासाठी -कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर बऱ्याच वेळा काम केल्याने डोळ्यात वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. या साठी गुलाबपाणी आयवॉश म्हणून वापरा. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात 4 चमचे गुलाब जल मिसळा आणि त्या पाण्याने डोळे धुऊन घ्या. डोळ्याच्या जळजळीपासून त्वरितच आराम मिळतो. 
 
3 धुळीचे कण काढण्यासाठी -हवेत धुळेंचे कण असतात जे आपल्या डोळ्यात जातात आणि डोळ्यात घाण साचते. या साठी झोपण्यापूर्वी गुलाबपाण्याच्या काही थेंब डोळ्यात घाला नंतर चेहरा पाण्याने धुऊन घ्या. असं केल्याने धूळ आणि प्रदूषणाचा प्रभाव कमी होईल.
 
4 डोळ्याची जळजळ कमी करतो- डोळ्यात जळजळ झाल्यामुळे पाणी येत. या समस्येपासून आराम मिळावा या साठी  गुलाब पाण्याचे काही थेंब डोळ्यात घाला. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती