उष्ट्रासन याला आंग्लभाषेत कॅमल पोझ देखील म्हणतात. या मध्ये मुद्रा उंटाप्रमाणे बनते. हे आसन स्त्रियांसाठी फायदेशीर आहे. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनेला नियंत्रित करण्याचे काम हे आसन करते. जे लोक लहानपणापासून या आसनाचा सराव करतात त्यांचे शरीर लवचिक असतात. खांदे बळकट करण्यासाठी देखील या आसनाचा नियमितपणे सराव करावा. चला हे आसन करण्याची पद्धत आणि ह्याचे फायदे जाणून घेऊ या.
पद्धत-
सर्वप्रथम जमिनीवर चटई अंथरून गुडघ्यावर बसावे आणि कुल्ह्यावर दोन्ही हात ठेवा. गुडघे आणि खांद्यातील अंतर समान असावे. पायाचे तळवे आकाशाकडे असावे. मागे वाकून हाताने तळपाय स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत पोटाला पुढे ओढा जेणे करून संतुलन बनेल . मानेवर दाब न टाकता तसेच बसावे. आणि याच स्थितीत श्वास घ्या आणि सोडा.
फायदे-
* पाठ आणि खांदे बळकट करतो.
* कंबरेच्या वेदनेपासून मुक्ती देतो.
* पाठीच्या कणात लवचिकता आणतो.
* अनियमित मासिकपाळीच्या त्रासातून सुटका देतो.
* स्तनांचा आकार चांगला करतो.
* पोट,दोन हनुवटी,आणि कंबरेचा लठ्ठपणा कमी करतो.