द्राक्ष खावून पडाल आजारी त्यावर असतात कीटकनाशके

सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (17:30 IST)
द्राक्षांमध्ये औषधी गुण आहेत आणि आता तर त्यांच्या ऋतू सुद्धा सुरु होतोय, मात्र त्यावरील जास्तीच्या कीटकनाशकाच्या वापरामुळे हीच द्राक्षं विविध आजारांना आमंत्रण देत आहे. सध्या उपराजधानी असलेल्या नागपुरात येथे द्राक्षं खाल्ल्याने खोकला, घशात खवखव, घसा बसण्याच्या अनेक तक्रारी वाढल्या असून त्यामुळे  डॉक्टरांनी द्राक्षं जपून खाण्याचा सल्ला दिला आहे. द्राक्षांचे वनस्पतिक नाव विटिस विनीफेरा असून, यामध्ये कार्बोहायड्रेड्स, प्रोटीन, इतरही महत्त्वाची पोषक द्रव्ये आहेत. 
 
यामुळे द्राक्षांमधील औषधी गुण पाहून हे फळ काही रोग्यांसाठी अनेकदा वरदान ठरते. काहींच्या मते रोज सकाळी व सायंकाळी चार-चार चमचे द्राक्षांचा रस भोजनानंतर सेवन केल्यास बुद्धी व स्मरणशक्तीचा विकास देखील होतो. द्राक्षे शरीरातील क्षारीय तत्त्व वाढवते. लठ्ठपणा, जॉर्इंट पेन, रक्तांच्या गाठी होणे, दमा आणि त्वचेवर लाल डाग येणे अशा समस्या दूर करतात. तर द्राक्षांचे सेवन केल्याने आतडे, यकृत पचनसंबंधित अडचणीही उत्तम प्रकारे दूर होतात. अनेक फायदे आहेत तरी त्यांना कीड लागू नये म्हणून त्यावर करण्यात आलेल्या अतिप्रमाणातील कीटकनाशके आरोग्यास अपायकारक ठरत असल्याचे आता समोर येते आहे. लोकांच्या मते हे फळ पाण्याने धुवून काढल्यानंतरही फळावरील पांढरा थर कायम असतो. 
 
असे फळ खाल्यानंतर खोकला, घशात खवखव तर काहींचा घसा बसण्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आता यापुढे जर द्राक्ष आणली तर ती योग्य पद्धतीने स्वच्छ करा आणि त्यांतर खा नाहीतर तुमच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती