गर्भवती असाल तर नका करू अधिक शाम्पू

गर्भावस्थेत अनेक प्रकारे शरीराची काळजी घ्यावी लागते. कळत- नकळत अश्या चुका होऊन जातात ज्याबद्दल महिलांना कल्पना नसते, जसे की शाम्पू वापरणे...
होय, एका संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे की शाम्पू अधिक वापरल्याने गर्भवती महिलांवर वाईट परिणाम होतात. याचे मुख्य कारण यात आढळणारे केमिकल्स आहे. हे चीनच्या एका पॅकिंग यूनिव्हर्सिटीमध्ये 300 हून अधिक महिलांवर केलेल्या एका शोधात सिद्ध झाले, ज्यात 172 महिला स्वस्थ गर्भवती तर 132 महिलांना गर्भपात झेलावे लागले होते. या महिलांच्या युरीन टेस्टद्वारे कळले की त्यांच्यात फॅथलेट्स केमिकल अधिक मात्रेत होतं ज्यामुळे गर्भपात झाला असावा.
 
या शोधाप्रमाणे गर्भावस्थेदरम्यान शाम्पू अधिक वापरल्याने गर्भपात झाले असावे. यामुळे गर्भवती महिलांना सतर्क राहणे गरजेचे आहे. गर्भवती महिलांनी शाम्पूऐवजी नैसर्गिक विकल्प शोधावा. याव्यतिरिक्त गर्भावस्थेत दररोज केस धुणे टाळावे. कारण यादरम्यान अधिक केस धुण्याने गर्भाशयात आकुंचन होऊ शकतं, जे गर्भस्थ शिशूसाठी धोकादायक ठरू शकतं.
 
शाम्पू अधिक वापरल्याने केवळ गर्भपाताचा धोका नव्हे तर लिव्हर संबंधी समस्याही उद्भवू शकतात. छाती दुखणे, श्वास संबंधी समस्या होऊ शकतात. याने कर्करोग सारखे आजारही उद्भवू शकतात. तसेच अधिक शाम्पू वापरल्याने केसांचं पोषणही थांबतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती