आपल्याला सर्वांनाच हे ठाऊक आहे की काकडी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आहारात काकडीचे सेवन केल्याने खूप फायदे मिळतात. पण काय आपल्याला माहीत आहे का की काकडीने जसे फायदे आहे तसेच बरेच नुकसान देखील आहे. बरेच लोक डायटिंगमुळे किंवा तसंच दिवसभरात 8-10 काकड्या खाऊन घेतात. तसे तर हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे आपल्यासाठी नुकसानदायक होऊ शकते.
रात्रीच्या वेळी कधी ही काकडी खाण्याची चूक करू नका. आपण ही म्हण तर ऐकलीच असेल की "सकाळी डायमंड, दुपारी काकडी आणि रात्री वेदना". याचा अर्थ असा आहे, सकाळी काकडी शरीरासाठी सर्वात फायदेशीर असते, दिवसा काकडी खाण्याचे सामान्य फायदे असतात पण रात्री घेताना ते हानिकारक आणि वेदनादायक असते.
काकडीमध्ये एक विषारी पदार्थ असतो ज्याला कुकबर्बिटाइन्स म्हटले जाते. आपण ज्या प्रमाणात काकडीचे सेवन करतात त्याच प्रमाणात हे विष आपल्या शरीरात जातं. यामुळे आपल्या यकृत, पॅन्क्रेटायटीस, पित्त मूत्राशय आणि किडनीसह इतर अनेक अवयवांना सूज येऊ शकते. म्हणून हे सीमित आणि संतुलित प्रमाणातच खायला पाहिजे.