तुमची आवडती कॉफी तुमचे वजन वाढवू शकते का? जाणून घ्या याविषयी तज्ञ काय म्हणतात

मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (16:10 IST)
आपल्यापैकी बरेच जण आपल्या दिवसाची सुरुवात एक कप कॉफीने करतात. याव्यतिरिक्त, असंख्य लोक दिवसभरात अनेक वेळा कॉफी घेतात. तुमच्या लक्षात आले असेल की अनेकदा लोकं वजन कमी करण्याच्या प्रवासात असताना त्यांना ब्लॅक कॉफी प्यायला आवडते. याचे कारण असे की कॉफी वजन कमी करण्यात मदत करू शकते असा विश्वास बर्‍याच लोकांचा आहे. पण, काही लोकांचा असाही विश्वास आहे की कॉफी प्यायल्यानेही वजन वाढू शकते. मग शेवटी सत्य काय आहे? कॅफिनचा शरीराच्या वजनावर परिणाम होतो का? वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कॉफी पिणे थांबवण्याची आणि कॅफिनचे सेवन मर्यादित करण्याची गरज आहे का?
 
कॉफी प्यायल्याने तुमचे वजन वाढते का?
एका रिपोर्टनुसार, जास्त कॉफी प्यायल्याने नक्कीच वजन वाढते. कारण त्यात कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते. वास्तविक, कॅफीनचे जास्त सेवन केल्याने चयापचय प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे वजन वाढते. अशा परिस्थितीत, जर कोणी दिवसातून 3-4 कप कॉफी प्यायले तर त्याचे वजन वेगाने वाढू लागते.
 
किती कॉफी प्यावी
जर तुम्ही योग्य प्रमाणात कॉफीचे सेवन केले तर त्याचा चयापचय प्रणालीवर परिणाम होत नाही आणि त्यामुळे वजन वाढत नाही, परंतु आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कॉफीचे सेवन योग्य प्रमाणात काय आहे. एका अहवालानुसार, दिवसातून दोन कप कॉफी सामान्य आहे. जर तुम्ही दिवसातून फक्त दोन कप कॉफी प्याल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. 
 
असे सेवन करा
कॉफी पिण्याचीही योग्य वेळ आहे. जर तुम्ही झोपेतून उठल्याबरोबर कॉफी प्यायली तर ती तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. दुसरीकडे, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दुधासोबत कॉफी घेणे टाळा. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे वजन वाढणार नाही आणि तुमचे आरोग्यही बिघडणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती