Tomato Flu: टोमॅटो फ्लू आणि त्याची लक्षणे जाणून घ्या

सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (14:53 IST)
Tomato Flu म्हणजे काय?
टोमॅटो फ्लू हा एक अज्ञात ताप आहे, जो केरळमध्ये पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळून आला आहे. फ्लूची लागण झालेल्या मुलाला पुरळ आणि फोड येऊ शकतात, ज्याचा रंग सामान्यतः लाल असतो. म्हणूनच याला 'टोमॅटो फ्लू' किंवा 'टोमॅटो फिव्हर' म्हणतात. हा रोग फक्त केरळच्या काही भागात आढळला आहे आणि आरोग्य अधिकार्‍यांनी चेतावणी दिली आहे की संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यास व्हायरस आणखी पसरू शकतो.
 
Tomato Flu ची लक्षणे काय आहेत?
टोमॅटो फ्लूच्या मुख्य लक्षणांमध्ये लाल पुरळ, फोड, त्वचेची जळजळ आणि शरीरावर निर्जलीकरण यांचा समावेश होतो. याशिवाय अति ताप, अंगदुखी, सांधे सुजणे, थकवा, पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब, खोकला, शिंका येणे व नाक वाहणे, हाताचा रंग बदलणे ही लक्षणे संसर्ग झालेल्या मुलांमध्ये दिसून येतो.
 
Tomato Flu चा सामना कसा करावा?
 टोमॅटो फ्लूची लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. यासह संसर्ग झालेल्या मुलावर पुरळ आणि फोड ओरबाडणार नाहीत याची काळजी घ्या. यासोबतच स्वच्छता राखावी. तसेच वेळोवेळी द्रवपदार्थ घेत राहण्याचा आणि योग्य विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती