मूळव्याध आणि डायबिटीजसाठी फायदेशीर आहे, रुईची पाने

शनिवार, 15 जून 2024 (05:57 IST)
आयुर्वेदामध्ये अनेक झाड-रोपे यांचे वर्णन केले आहे जे आरोग्यासाठी वरदान मानले जाते. अश्याच रोपांमध्ये सहभागी आहे रुईचे रोप. ज्याला आक किंवा मदार देखील संबोधले जाते. 
 
या रूईच्या पानांमध्ये अँटीऑक्सीडेंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात. जे बद्धकोष्ठता, दस्त, गुडग्यांचे दुखणे, दातांची समस्या यावर उपयोगी असतात. तसेच मूळव्याध आणि डायबिटीजसाठी फायदेशीर असतात 
 
मूळव्याधसाठी फायदेशीर-
मूळव्याधीने त्रस्त असलेल्या लोकांनी रुईच्या पानांचा उपयोग नक्की करावा रुईचे पाने बारीक वाटून जखमेवर लावल्यास जखम लवकर बारी होते व दुखण्यापासून अराम मिळतो. 
 
फायदेशीर फायदेशीर- 
आयुर्वेदामध्ये रुईच्या पानांना खूप महत्व दिले आहे. तसेच एक शक्तिशाली जडीबुटी देखील मानले गेले आहे. तसेच रुईचे पाने, फुल इंसूलिन रजिस्टेंटला थांबवण्यास मदत करतात. तसेच ब्लड शुगर लेव्हल मध्ये सुधारणा करतात. 
 
त्वचा संबंधित समस्या-
रुईच्या रसामध्ये अनेक प्रकारचे अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुण असतात. जे त्वचेवर येणारी सूज, जळजळ कमी करते. तसेच त्वचेला संक्रमित होण्यापासून वाचवते. 
 
गुडघे दुखी पासून अराम-
रुईच्या पाने सूज कमी करण्यासाठी मदत करतात. थोडे तेल गरम करून गुढग्यावर लावावे. व रुईच्या पानांनी झाकून द्यावे. यामुळे दुखणे बरे होते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती