सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते कसे ,मजबूत होतात हाडे, जाणून घ्या.

मंगळवार, 11 मे 2021 (21:46 IST)
सूर्यप्रकाशाचे फायदे-आयुष्यात सूर्याला खूप महत्त्व असते. सकाळी सूर्याचा प्रकाश चेहऱ्यावर आला की झोप उघडते.नैसर्गिकरित्या उघडणारी झोप आरोग्यासाठी नेहमीच चांगली असते.सध्या सूर्याच्या उष्णतेमुळे अनेक आजारांचा धोका असतो. जसे की अन्नातून विषबाधा पाण्याची कमतरता, त्वचेचा चा कर्करोग,अपचनाची समस्या इ. परंतु  सूर्य आपल्या शरीराला बळकट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे व्हिटॅमिन्स देतो. 
जेव्हा शरीरात व्हिटॅमिनची कमतरता येते तेव्हा हाडे कमकुवत होऊ लागतात, डॉक्टर आपल्याला सूर्यप्रकाश घेण्यास सल्ला देतात. तथापि, सूर्यप्रकाश फक्त सकाळी 7 ते 9 पर्यंत घेतला जाऊ शकतो, म्हणजेच फक्त 2 तास. अन्यथा ते हानिकारक असते.
दररोज सकाळी 15 मिनिटांचा सूर्यप्रकाश घेतल्याने हाडे मजबूत होतात, तणाव कमी होतो, भूक सुधारते आणि झोप सुधारते, कारण सूर्यापासून मिळणारे व्हिटॅमिन्स आपल्या शरीरात पोहोचतात.
नियमितपणे सूर्यप्रकाश घेतल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता कधीच उद्भवणार नाही. प्रत्येकाने दररोज सकाळी 15 मिनिटांचा सूर्यप्रकाश घ्यावा, मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती