1 जूनपासून 20 संघांमध्ये T20 विश्वचषक 2024 खेळवला जाणार आहे. हा सामना अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या यजमानपदावर खेळवला जाईल. स्पर्धेसाठी सर्व संघांची घोषणा करण्यात आली असून, पहिला सामना कॅनडा आणि अमेरिका यांच्यात 1 जून रोजी होणार आहे. तर भारत 5 जूनला आयर्लंडविरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल. त्याचबरोबर या स्पर्धेतील सर्व संघांमध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे पहिल्यांदाच T20 विश्वचषक खेळणार आहेत. सर्वांच्या नजरा या युवा खेळाडूंवर असतील.