आता T-20 विश्वचषक सुरु होण्यासाठी फक्त 10 दिवस उरले आहेत. भारतीय संघ लवकरच अमेरिकेला रवाना होण्याच्या तयारीत आहे. जिथे लीग स्टेजचे सामने खेळवले जातील. या वर्षी पहिल्यांदाच 20 संघ T-20 विश्वचषकात सहभागी होत आहेत. ज्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघासोबत पाकिस्तानशिवाय अमेरिका, कॅनडा या संघांचाही अ गटात समावेश आहे.
12 जून रोजी भारत आणि अमेरिका यांच्यात प्रथमच टी-20 क्रिकेट खेळला जाणार आहे. भारतीय संघाचा पुढील सामना 15 जून रोजी कॅनडाशी होणार आहे.भारतीय संघ प्रथमच या दोन्ही संघांविरुद्ध टी-20 सामना खेळणार आहे.रविवारी, 9 जून 2024 रोजी टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक शानदार सामना रंगणार आहे.