अमेरिका आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी खेळला गेला. या सामन्यात अमेरिकेने आपली ताकद दाखवत शाकिब-अल-हसनच्या नेतृत्वाखालील संघाचा सहा धावांनी पराभव केला आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. याआधी अमेरिकेने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला होता.
दुसऱ्या टी-20 सामन्यात अमेरिकेची सुरुवात चांगली झाली होती. कर्णधार मोनक पटेल आणि स्टीव्हन टेलर यांच्यात पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी झाली. आंद्रे गॉस एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात आरोन जोन्सने 35, कोरी अँडरसनने 11, हरमीत सिंगने शून्य, मोनक पटेलने 42, नितीश कुमारने सात (नाबाद) आणि शेडलीने (नाबाद) सात धावा केल्या. बांगलादेशकडून शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.