आयपीएल 2025 हंगामातील 65 वा लीग सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाईल, ज्यामध्ये दोन्ही संघांमधील हा सामना लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. तर नाणेफेक अर्ध्यातासापूर्वी 7 वाजता होणार आहे.
या खेळपट्टीवर सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना फायदा मिळतो, नंतर फिरकी गोलंदाजांना फायदा मिळतो. या खेळपट्टीवर आता पर्यंत 6 सामने खेळवले गेले आहे ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 5 सामने जिंकले आहे. या स्टेडियमवर एकूण 20 आयपीएल सामने खेळले गेले आहे. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 8 सामने ते लक्ष्याच्या पाठलाग करणाऱ्या संघाने 11 सामने जिंकले आहे.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 24 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने11 सामने जिंकले आहेत तर सनरायझर्स हैदराबादने 13 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच लढत असेल.
आरसीबी : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, टीम सेफर्ट, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी, यश दयाल
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अर्थव तायडे, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, कामिंदू मेंडिस, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, हर्षल पटेल, हर्ष दुबे, इशान मलिंगा.