हंगामाची सुरुवात हिटमनसाठी फारशी खास नव्हती. पहिल्या पाच सामन्यांमध्ये तो 0, 8, 13, 17 आणि 18 धावा करून बाद झाला. तरीही, त्याने हार मानली नाही आणि गेल्या पाच डावांमध्ये तीन अर्धशतके झळकावत शानदार पुनरागमन केले. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने 31 चेंडूत आयपीएल 2025 मधील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. यासह, तो टी-20 मध्ये संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. या बाबतीत रोहितने हॅम्पशायरच्या जेम्स विन्सला मागे टाकले. त्याने 6000 पेक्षा जास्त धावा केल्या.
जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात रोहित शर्मा डावाच्या दुसऱ्या षटकात बाद होण्यापासून थोडक्यात बचावला. यानंतर, त्याने दिलेल्या आयुष्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि 36चेंडूत 53 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या शानदार खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून नऊ चौकार आले.