यासह राहुलने आयपीएलमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या. तो सर्वात कमी डावांमध्ये असे करणारा फलंदाज बनला आहे. राहुलने 130 डावांमध्ये डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत ही कामगिरी केली. वॉर्नरने आयपीएलमध्ये 135डावांमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्लीला सुरुवातीलाच करुण नायरच्या रूपात धक्का बसला. त्याने नऊ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकारासह 15 धावा काढल्या आणि बाद झाला. यानंतर, राहुल आणि पोरेल यांनी दिल्लीचा डाव पुढे नेला आणि दुसऱ्या विकेटसाठी69 धावांची भागीदारी केली.
राहुल आणि अक्षरने गीअर्स बदलले आणि वेगाने खेळायला सुरुवात केली. राहुलने 40 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर प्रिन्स यादवच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीकडून अक्षर पटेलने 20 चेंडूंत एका चौकार आणि चार षटकारांसह 34 धावा काढत नाबाद राहिला. राहुल आणि अक्षर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 56 धावांची नाबाद भागीदारी केली. लखनौकडून मार्करामने दोन्ही विकेट घेतल्या.