KKR vs GT: केकेआरचा सलग दुसरा पराभव, गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर

मंगळवार, 22 एप्रिल 2025 (08:03 IST)
गुजरात टायटन्सने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ला 39 धावांनी पराभूत करून अव्वल स्थानावर आपले वर्चस्व मजबूत केले. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर गुजरातने 20 षटकांत 3 बाद 198 धावा केल्या, प्रत्युत्तरात केकेआर 20 षटकांत 8 बाद 159 धावाच करू शकला.
ALSO READ: बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केला,टीम इंडियाच्या खेळाडूंची लागली लॉटरी
या हंगामात केकेआरने सलग दोन सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.आयपीएल 2025 चा 39वा लीग सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स संघादरम्यान ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात आला.
 
गुजरातचा आठ सामन्यांतील हा सहावा विजय आहे आणि ते १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. या हंगामात गुजरातने दोन सामने गमावले आहेत. त्याच वेळी, केकेआरचा आठ सामन्यांमधील हा पाचवा पराभव आहे आणि ते तीन विजयांनंतर सहा गुणांसह पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहेत. 
ALSO READ: एमसीए ने वानखेडे स्टेडियमच्या पॅव्हेलियनला रोहित शर्मा, अजित वाडेकर आणि शरद पवार यांचे नाव दिले
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 2 षटकांत 3 गडी गमावून 198 धावा केल्या. गिलने 90 धावांची खेळी खेळली. साई सुदर्शनने अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात, कोलकाता 20 षटकांत 8गडी गमावून फक्त 159 धावा करू शकला.
 
केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 36 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह 50 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी गुरबाजची विकेट लवकर गमावली. यानंतर, रहाणेने सुनील नरेनसह संघाची धुरा सांभाळली, परंतु नरेन 17 धावा करून बाद झाला. त्यानंतर रहाणेने चांगली खेळी खेळत राहिली, पण दुसऱ्या टोकाकडून कोणताही फलंदाज त्याला साथ देऊ शकला नाही. मोठी भागीदारी करण्यात असमर्थता हे केकेआरच्या पराभवाचे एक प्रमुख कारण बनले. केकेआरचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी, शेवटच्या सामन्यात त्याला पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता.  
Edited By - Priya Dixit 
 
ALSO READ: ऑगस्टमध्ये 3 एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळण्यासाठी टीम इंडिया बांगलादेशचा दौरा करणार
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती