IND vs BAN 1st Test Day 5 : भारताने बांगलादेशवर 188 धावांनी मात केली

Webdunia
रविवार, 18 डिसेंबर 2022 (10:12 IST)
भारताने बांगलादेश विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 188 धावांनी जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताकडून चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांनी अप्रतिम कामगिरी केली. या मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
 
बांगलादेशचा दुसरा डाव 324 धावांवर आटोपला. अक्षर पटेलने तैजुल इस्लामला क्लीन बोल्ड करून बांगलादेशचा डाव संपवला. यासह भारताने हा सामना 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते आणि या विजयासह भारताने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीकडे एक पाऊल टाकले आहे. आता भारताला उरलेल्या पाचपैकी चार कसोटी जिंकायच्या आहेत.
 
Edited By  Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

पुढील लेख