महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. मुंबईची कमान अनुभवी हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. ती भारतीय संघाची कर्णधारही आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी गुजरातचे नेतृत्व करत आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई इंडियन्सचा डाव सुरू झाला आहे. यास्तिका भाटिया विंडीजच्या हिली मॅथ्यूजसोबत सलामीसाठी मैदानात उतरली आहे. गुजरातचे पहिले षटक अॅशले गार्डनरने केले.