रवींद्र जडेजाच्या दुखापतीनंतर अक्षर पटेल भारतीय संघात कायम आहे. आपल्या गोलंदाजीमुळे चर्चेत असलेल्या अक्षरने या काळात फलंदाजीतही छाप पाडली. लग्नानंतर अक्षर पटेल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडियात परतणार आहे. मात्र, रवींद्र जडेजा तंदुरुस्त असल्याने अक्षरला आगामी काळात भारतीय संघात आपले स्थान टिकवून ठेवणे सोपे जाणार नाही.अक्षर पटेलच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
अक्षर पटेलने या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळली होती, ज्यामध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. आता भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. अक्षरने लग्नासाठी या दोन्ही मालिकांमधून ब्रेक घेतला आहे.