वाढत्या वयात किंवा तारुण्यात येत असताना बहुतेकदा मुला मुलींना मुरूम आणि या सारख्या समस्यांना सामोरी जावे लागते. या मागील अनेक कारणे आहे. तणावापासून घेऊन हार्मोन्स मध्ये बदल आणि तेलकट त्वचा असणे देखील कारणीभूत आहे. अशा परिस्थितीत चेहरा निस्तेज आणि मुरूम सौंदर्याला खराब करतात. म्हणून आवश्यक आहे की या तारुण्य वयात देखील त्वचेची काळजी घेतली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊ या की त्वचेची काळजी कशी घ्यावी.
* घरगुती उपचार -
घरगुती उपचार बरेच असतात परंतु जास्त फायदेशीर आणि भरवशाचे उपचार आहे हरभराडाळीचे पीठ, दही, कच्चं दूध आणि व्हिटॅमिन ई ची गोळी. हे सर्व एका वाटीत मिसळून घ्या हे पॅक चेहऱ्यावर लावून दहा मिनिटे तसेच ठेवा नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. महिन्यातून एक किंवा दोन वेळा या पॅक चा वापर केल्याने त्वचा तजेल आणि चमकदार बनेल.