त्वचा उजळण्यासाठी डाळिंब आणि साखरेचं स्क्रब वापरा

मंगळवार, 2 मार्च 2021 (20:28 IST)
आपण कामकाजी महिला असाल तर  दररोज ऑफिसात जाण्यासाठी मेकअप करत असाल. उन्हात बाहेर पडल्यामुळे त्वचा काळपटते बऱ्याच वेळा त्वचेवर फ्रीकल्स येतात आणि सुरकुत्या पडतात.त्वचेला उजळण्यासाठी स्त्रियां बरेच काही उपाय करतात त्यासाठी महागडे उत्पादन वापरतात. त्याचा काहीच फायदा होत नाही. या साठी फायदा हवा असल्यास घरात बनलेले डाळिंब आणि साखरेचे होम स्क्रब वापरा.हे स्क्रब त्वचेला उजळतो.चला तर मग जाणून घेऊ या स्क्रब कसे बनवायचे.
 
साहित्य -
1 चमचा नारळाचं तेल,1/2 चमचा साखर,5 चमचे डाळिंबाचे दाणे , 2 चमचे साय.
 
कृती - हे स्क्रब बनविण्यासाठी सर्वप्रथम साखर दळून घ्या.एका वाटीत पिठी साखर घ्या. त्यामध्ये डाळिंबाचे दाणे घालून क्रश करा.नारळाचं तेल आणि साय मिसळा स्क्रब तयार आहे.
 
कसं वापरावं- 
सर्वप्रथम चेहरा पाण्याने धुऊन घ्या.हातात स्क्रब घ्या चेहऱ्यावर मानेवर हळुवारपणे लावून मॉलिश करा. 10 मिनिटे चेहऱ्याची मॉलिश केल्यावर आतील घाण बाहेर निघेल आणि मृतत्वचा देखील स्वच्छ होईल. या मुळे चेहरा उजळेल. 
आठवड्यातून 3 वेळा हे स्क्रब वापरा. दुसऱ्या दिवसापासून ह्याचा प्रभाव चेहऱ्यावर दिसतो.
हे स्क्रब केल्याने चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात आणि चेहऱ्यावर चकाकी येते. त्वचा निरोगी राहते. आठवड्यातून किमान तीन वेळा या स्क्रबचा वापर करावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती