तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यासाठी लोक स्किन केयरच्या नित्यक्रमात अशे उत्पादन जास्त वापरतात जे आपल्या त्वचेला अधिक कोरडी करतात आणि त्वचेचे टेक्श्चर देखील खराब करतात. त्वचेचा तेलकट पणा कमी करण्यासाठी अशी उत्पादने वापरली जातात जे त्वचेला अधिक कोरडी बनवतात. अशा परिस्थितीत शरीर तेलाचे अधिक प्रमाणात उत्पादन करण्यास सुरुवात करते. या मुळे सिबमच्या अधिक उत्पादनामुळे चेहऱ्यावर मुरुमांची समस्या उद्भवते.
* अंडी फोडून घ्या. या मध्ये काकडीचे रस मिसळा, पुदिना वाटून घाला. तेलकट त्वचेसाठी अंडी चांगली असते जे त्वचा घट्ट ठेवण्यासाठी छिद्रांना संकुचित करण्यासाठी अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी मदत करते. काकडीचे रस त्वचेला थंडावा देतो पुदिना अँटी बेक्टेरियल गुणधर्माने समृद्ध असते सॅलिसिलिक सिबम फोडून मुरूम कमी करते.
*अर्धी केळी घ्या. या मध्ये लिंबाचा रस आणि ऑलिव्ह तेलाच्या काही थेंबा घाला.ही पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे तसेच ठेवून द्या. केळी त्वचेमधील जास्तीचे सिबम आणि मृत त्वचा पासून सुटका मिळविण्यात मदत करते, ऑलिव्ह तेल त्वचेला पोषण देण्याचे काम करतो.
हरभरा डाळीचे पीठ त्वचेसाठी योग्य मानले आहे. हे त्वचेच्या तेलाला संतुलित करण्याचे काम करते. या मध्ये चिमूटभर हळद मिसळा. हळद अँटिसेप्टिक गुणधर्माने समृद्ध आहे. मुरुमांना बरे करण्यात मदत करते, ब्रेकआउट्स होण्यापासून रोखते आणि दही त्वचेला पोषण देण्याचे काम करतो.