त्वचेचे आणि केसांचे सौंदर्य वाढवणारे बहुउपयोगी मध

गुरूवार, 4 मार्च 2021 (09:00 IST)
मध हे घरगुती उपचारासाठी नेहमी फायदेशीर आहे. लोकांना त्याचे महत्त्व समजत नाही.मध हे आरोग्यासाठी तसेच सौंदर्य वाढविण्यासाठी देखील फायदेशीर आहे. या तीन मार्गाने हे वापरा त्वचेचे आणि केसांचे सौंदर्य वाढतील 
 
मध अँटी बेक्टेरिअल आणि अँटिसेप्टिक घटकांनी समृद्ध आहे. हे डोक्यातील कोंडा मुक्त करण्यात मदत करतात. हे त्वचेला स्वच्छ करण्यात मदत करतात. मध कसे वापरायचे हे जाणून घेऊ या.  
 
स्क्रब- 
त्वचेला एक्सफॉलिकरण करणे खूप महत्त्वाचे आहे. दररोज स्क्रब केल्याने त्वचा कोरडी आणि कडक होते. अशा परिस्थितीत मध त्वचेला मॉइश्चराइझ करण्यात मदत करते. या साठी कॉफी पावडरमध्ये साखर आणि मध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट शॉवर जेल मध्ये देखील मिसळू शकता. आणि बॉडी स्क्रब म्हणून देखील वापरू शकता.  
 
* फेस मास्क-
चेहऱ्यावरील त्वचा मऊ आणि कोरडी करावयाची असल्यास मध पूर्णपणे मदत करते. या साठी  एक केळीची आवश्यकता आहे. केळी मॅश करून मध मिसळून पेस्ट बनवा. या मध्ये गरजेप्रमाणे दूध देखील मिसळू शकता. चेहऱ्यावर ही पेस्ट लावा आणि दहा मिनिटे ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. फरक लगेच दिसेल.
 
* केसांसाठी फायदेशीर -
घरीच केसांचा स्पा हवा असल्यास मध उत्तम आहे. या साठी 
एका भांड्यात नारळाचं तेल घेऊन पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांवर लावा. तास भर तसेच ठेवा. नंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ करा. या पेस्ट मुळे केस मऊ आणि चमकदार होतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती