चष्मा लावल्याने काळे डाग झाले असल्यास हे करा

शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (22:44 IST)
* काळे डाग झाल्यास कोरफड लावा. कोरफड मधून कापून त्याच्या गिरीचे पेस्ट बनवून नाकावर पडलेले डागांवर लावा. काही दिवसातच डाग नाहीसे होतील.
 
* बटाटा किसून त्याचा रस डागांवर लावा काही वेळ रस लावून ठेवा काहीच दिवसात डाग नाहीसे होतील. 
 
* मध मध्ये अँटीऑक्सीडेंट आणि अँटिसेप्टिक गुणधर्म असतात जे त्वचेवरील काळे डाग नाहीसे करतात. 
 
* टोमॅटो मध्ये एक्सफॉलिएशन गुणधर्म असतात जे चेहऱ्यावरील मृत त्वचेला  काढतात टोमॅटोची पेस्ट बनवून डागांवर लावा यामुळे डाग नाहीसे होतात. 
 
* संत्र्याच्या सालाची भुकटी काळे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर आहे संत्र्याच्या सालीची भुकटी करून दुधात मिसळून पेस्ट बनवून लावा. या मुळे नाकावरील डाग नाहीसे होतील 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती