नारळाचं तेल: नारळाचं तेल खूप चांगलं मॉइश्चहरायजर असतं. हे तेल प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी लाभदायक ठरतं. नारळाचं तेल वापरल्यानं अवेळी त्वचेवर सुरकुत्या दिसून येत नाही. दोन चमचे नारळाचं तेल, एक चमचा मध आणि एक चमचा संत्र्याचा रस मिसळून त्वचेवर लावा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुऊन घ्या.
काकडी: काकडीमध्ये ९५ टक्के पाण्याचा अंश असतो, त्यामुळे काकडी त्वचेचं मॉइश्चररायजेशन चांगल्या पद्धतीनं करू शकतं. काकडीचा रस चेहर्र्यावर आणि मानेवर ३0 मिनिटांपर्यंत लावून ठेवा.. त्यानंतर पाण्यानं चेहरा धुऊन घ्या.
कोरफड: कोरफड हा सर्वोत्तम उपाय तुम्ही कधीही वापरू शकता. कारण त्वचा तेलकट असो वा कोरडी त्यासाठी कोरफड उपयोगी ठरतं. यामध्ये असणारे बीटा-कॅरोटिन, व्हिटॅमिन 'सी' आणि 'ई' त्वचेला स्वस्थ ठेवतात. यासाठी कोरफडीचा गर चेहर्यारला लावून ठेवा.. आणि काही वेळाने धुऊन टाका.. मग पाहा, तुमच्या चेहर्र्याची चमक..