त्वचा अधिक कोरडी होत असेल तर अशी घ्या काळजी

गुरूवार, 21 जानेवारी 2021 (22:20 IST)
हिवाळ्याच्या हंगामात त्वचेची काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे. या हंगामात लोक आपल्या कोरड्या त्वचेने जास्त वैतागलेले असतात. बरेच सौंदर्य उत्पादक वापरून देखील त्वचा कोरडीच राहते. या मुळे त्वचेत खाज येणं आणि त्वचा ओढल्या सारखी जाणवते. कधी कधी तर सुरकुत्या देखील दिसून येतात. हिवाळ्यात त्वचेला अतिरिक्त टीएलसी देण्याची गरज असते. हंगामात बदल झाल्यावर त्वचेत देखील बदल होतात. म्हणून महत्त्वाचे आहे की पूर्वी पासूनच आपल्या त्वचेची काळजी घेणं या साठी काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून बघा. 
 
* मॉइश्चरायझर लावण्याची उत्तम वेळ -
हिवाळ्यात मॉइश्चरायझर मुबलक प्रमाणात वापरतात, परंतु  हे कधी लावायचे आहे हे जाणून घेऊ या. जेव्हा आपण अंघोळ करून याल किंवा तोंड धुऊन आला की लगेचच मॉइश्चरायझर लावावा. मॉइश्चरायझर म्हणून ग्लिसरीन आणि शिया बटर सारख्या हायड्रेटिंग इंग्रिडियन्ट असलेली क्रीम किंवा लोशन वापरा.त्वचेला मऊ, कोमल, निरोगी आणि ओलसर बनविण्यासाठी ह्याचा वापर करतात.
 
* सौम्य फेस क्लिन्झर आणि साबण -
हार्श फेस वॉश किंवा साबण आपल्या चेहऱ्याचे नैसर्गिक तेल संपवतात. त्वचा ड्राय असेल तर जेंटल बॉडी आणि फेस वॉश वापरा जे सौम्य असावे. सांगू इच्छितो की चेहऱ्याची त्वचा शरीराच्या इतर त्वचे पेक्षा जास्त संवेदनशील आणि मऊ असते. अशा परिस्थितीत असं काही वापरू नये की ज्याचा वाईट परिणाम त्वचे वर पडेल. 
 
*  एक्सोफोलिएट करण्यास विसरू नये-
  हिवाळ्याच्या हंगामात आठवड्यातून किमान एकदा एक्सोफोलिएट किंवा स्क्रब करायला विसरू नये. या साठी नरिशिंग किंवा पौष्टिक स्क्रब वापरा. ज्यामुळे आपल्या त्वचेला त्रास होणार नाही. हे मृत त्वचा दूर करण्यास मदत करेल. या मृत त्वचेमुळे क्रीम किंवा लोशन त्वचेमध्ये शोषित होत नाही. आपले त्वचा अधिक ड्राय असल्यास दोन आठवड्यातून एक वेळाच  करा.  
 
* अधिक मॉइश्चरायझर वापरा-
जर आपले त्वचा अधिक कोरडी आहे तर शरीराच्या इतर भागांवर देखील त्याचा परिणाम दिसून येईल. अशा परिस्थितीत चेहऱ्याची त्वचाच नाही तर हात आणि पायांसह शरीराच्या इतर भागांवर देखील अधिक क्रीम लावण्याची गरज असते. नॉन-कॉमेडोजेनिक घटक जसे की हायल्यूरॉनिक आणि ऑलिव्ह एक्सट्रॅक्ट आपल्या त्वचेला मऊ ठेवत. ह्याचा वापर केल्यानं त्वचा गुळगुळीत होत नाही.
 
* गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा-
 गरम पाण्या ऐवजी कोमट पाण्यात अंघोळ करा. अधिक प्रमाणात गरम शॉवर घेतल्याने त्वचा कोरडी होऊ शकते, या मुळे खाज होण्याची समस्या उद्भवू शकते. कोमट पाण्याने अंघोळ केल्यानं त्वचेत ओलावा राहतो. ड्राय त्वचेशी मुक्त होण्यासाठी आपण अंघोळीच्या पूर्वी शरीराला तेल लावू शकता. कोरडी त्वचा टाळण्यासाठी ही अतिशय जुनी पद्धत  आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती