चेहरा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

सोमवार, 25 जानेवारी 2021 (09:06 IST)
चेहरा सुंदर दिसावा यासाठी प्रयत्न करत असला तरी यश मिळत नसेल तर आपण काही चुका करत आहात. जसे चेहऱ्यावरील मेकअप न काढणे. किंवा थेट चेहरा फेसवॉशने धुणे ज्याने चेहरा नीटपणे स्वच्छ होत नाही उलट धूळ किंवा इतर बॅ‍क्टेरिया तसेच साचलेले राहतात. 
 
अनेक लोक स्वत:चे हात न धुताच चेहरा धुतात ज्याने अनेकदा त्वचेवर पुरळ येऊ लागतात. म्हणून आधी हात स्वच्छ धुवावे मग चेहरा.
 
कोरडी त्वचा असल्यास या प्रकारे करा चेहरा स्वच्छ 
सर्वात आधी मेकअप क्लिनझरने चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून दोनदा माईल्ड स्क्रबने चेहरा स्वच्छ करा. झोपण्यापूर्वी मॉश्चरायझर लावून आणि नाइट क्रिम लावून झोपा.
 
तेलकट त्वचा असल्यास या प्रकारे करा चेहरा स्वच्छ
सर्वात आधी अधिक काळ मेकअप राहू न देता क्लिन करा. नंतर फेसवॉश वापरुन कोमट पाण्याने चेहरा धुवा. पोअर्स बंद करण्यासाठी बर्फ चेहऱ्याला चोळा. झोपताना चेहऱ्याला मुरुमवर प्रभावी क्रिम लावा.
 
सामान्य त्वचा असल्या या प्रकारे का चेहरा स्वच्छ
सर्वात आधी क्लिनझरने मेकअप काढून घ्या आणि चेहरा धुऊन घ्या. चेहऱ्यावरील धूळ काढण्यासाठी एखादे माईल्ड स्क्रब वापरा. झोपताना सिरम लावून झोपा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती