Daily Hair Care Tips केसांची निगा राखा या 5 सोप्या प्रकारे

बुधवार, 27 जानेवारी 2021 (09:08 IST)
निरोगी केसांसाठीचे अनेक उपाय सांगण्यात येतात परंतू दररोज ते करणे अनेकदा ‍कठिण जातं अशात सोप्यारीत्या केसांची निगा राखण्यासाठी केवळ हे 5 उपाय पुरेसे आहेत-
 
दर दुसर्‍या दिवशी रात्री झोपताना केसांना तेल लावून हलक्या हाताने मालीश करा. टाळूवर तेल ओतून मग मालीश करा ज्याने निरोगी केसांची वाढ होते. 
 
केस धुण्यासाठी पाठी कोमट वापरावं. गरम पाण्याने केसांना नुकसान होतं. त्वचा कोरडी पडते. म्हणून कोमट किंवा गार पाण्याने केस धुवावेत.
 
वेगवेगळ्या प्रकारच्या केसांसाठी वेगवेगेळे शैंपू फायदेशीर ठरतात, म्हणूनच आपल्या केसांच्या प्रकारानुसार माइल्ड शैंपू निवडा. तसेच शैंपू थेट केसांवर न लावता आधी जराश्या पाण्यात घोळून मग अप्लाय करा.
 
आपले केस धुतल्यानंतर अजून कोरडे किंवा वाईट दिसत असल्यास शैंपूनंतर कंडिशनर वापरा. कंडिश्नरमुळे केस गुळगुळीत आणि चमकदार होतात.
 
केवळ केस धुणे नव्हे तर कोणत्या पद्धतीने कोरडे करता हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. शक्यतो ब्लो ड्रायरचा वापर टाळा आणि केसांना नैसर्गिकरीत्या कोरडे होऊ द्या. मऊ तंतू असलेला टॉवेल किंवा कॉटनाचा जुना कपडा वापरणे अधिक योग्य ठरेल. केसांच्या मुळांपासून सुरु करून टोकापर्यंत केसे अगदी हलक्या हाताने पुसावे. आणि केस कोरडे होत नाही तोपर्यंत कंगवा करु नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती