Maharashtra Tourism : महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहे. प्रत्येक मंदिराचे आपले काही खास वैशिष्ट्ये आहे. महाराष्ट्रात सण, उत्सव, यात्रा मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. तसेच एक देवीचे जागृत मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात निघोज गावामध्ये स्थपित आहे. या निघोज गावात देवी मळगंगा देवीचे एक जागृत देवस्थान आहे. तसेच हे गाव कुकडी नदीच्या काठावर वसलेले आहे.
मळगंगा देवी नवसाला पावणारी देवी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मळगंगा देवीचे मंदिर स्वयंभू आणि जागृत आहे. इथे देवीचे एकूण सात मंदिर पाहावयास मिळतात. तसेच निघोज गावात देवी आईचे सुंदर असे संगमवरी मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात एक हेमांडपंथी शैलीतील विहीर देखील आहे. येथील विशेष चमत्कार म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमेला मध्यरात्री साधारण बारा वाजता या विहिरीतून मातीची घागर निघते. हा खूप मोठा चमत्कार मानला जातो. या घागरीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त इथे येतात. तसेच या घागरीची विधिवत पूजा करून भव्य मिवणूक काढून घागर पुन्हा विहिरीत विधिवत विसर्जित केली जाते.
नवरात्रीमध्ये मळगंगा देवीचा मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. राज्यभरातून भाविक देवीच्या दर्शनाला येतात. नवरात्रीच्या पर्वावर मंदिर सजवण्यात येते. तसेच सकाळी आणि संध्याकाळी देवीआईची महाआरती केली जाते. देवी मळगंगा यात्रेची सुरुवात हळद दळण्याने होते व त्यानंतर देवीची हळद चोळीने भव्य मिरवणूक काढली जाते. मळगंगा देवीला हळद लावली जाते. व येथील खास वैशिष्ट्ये म्हणजे हळद लावून देवीची पूजा करण्याचा मान महिलांना आहे. मंदिरपरिसरात नवरात्रीदरम्यान भजन, कीर्तन, कार्यक्रम केले जातात. सर्व भक्त देवीच्या भक्तीत तल्लीन होतात. चैत्र महिन्यात मळगंगा देवीचा उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात अनेक भाविक सहभागी होतात. देवीची भव्य दिव्य पालखी निघते. या मंदिराची ख्याती महाराष्ट्रभर आहे.
तसेच निघोज या गावात प्रसिद्ध रांजण खळगे आहे. मळगंगा आणि रांजण खळगे यांचे धार्मिक संबंध आहे. रांजण खळगे हे आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून प्रसिद्ध आहे. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झालेली आहे. या कुंडाचे वैशिष्ट्ये म्हणजे इथे निरंतर पाणी राहते. या कुंडातील पाणी कधीही संपत नाही. तसेच या कुंडाच्या सभोवताली अनेक सुंदर दगड पाहावयास मिळतात. येथील आणखीन एक वैशिष्ट्ये म्हणजे येथे तिन्ही ऋतूंमध्ये निसर्गाचे वेगवेगळे सौंदर्य दृष्टीस पडते. पावसाळ्यात येथे धबधबे वाहतात. जे अगदी मनाला भुरळ घालतात. उन्हाळ्यात देखील या कुंडाचे पाणी आटत नाही. ज्यामुळे येथे कायम हिरवळ असते. आता हे ठिकाण पर्यटन घोषित झाले असून अनेक पर्यटक इथे भेट देत असतात. निघोजचे हे धार्मिक ठिकाण पर्यटकांसाठी भेट देण्याची सुवर्णसंधी आहे.
अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हे शहर महाराष्ट्रतील प्रमुख शहर आहे. तसेच हे शहर अनेक प्रमुख शहरांना रस्ता मार्गाने जोडलेले आहे. बस किंवा खासगी वाहनाच्या मदतीने मंदिरापर्यंत सहज पोहचता येते. मंदिरापासून सर्वात जवळचे विमानतळ हे अहिल्यानगर विमानतळ असून तिथून टॅक्सी किंवा कॅप मदतीने मंदिरापर्यंत पोचता येते. अहिल्यानगर रेल्वे स्टेशन हे अनेक प्रमुख रेल्वे मार्गांना जोडलेले आहे. स्टेशनवरून स्थानिक बस किंवा टॅक्सीच्या मदतीने मंदिरापर्यंत पोंहचता येते.