तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू कायदेशीर वादात अडकले आहे. हैदराबादमधील एका महिला डॉक्टरने अभिनेत्याविरुद्ध रिअल इस्टेट घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. डॉक्टरचा दावा आहे की त्याने प्लॉट खरेदी करण्यासाठी सुमारे ३४.८ लाख रुपये दिले होते, परंतु तो प्लॉट प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हता. या प्रकरणात, तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्हा ग्राहक आयोगाने महेश बाबू यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तक्रारीत असेही म्हटले आहे की ज्या रिअल इस्टेट कंपनीच्या प्रमोशनमध्ये महेश बाबू सहभागी होते त्यांच्यावर ही फसवणूक केल्याचा आरोप आहे.