समाजातील अनेक घटकांचा उल्लेख काँग्रेसने नवी दिल्लीमधील मुख्यालयातून घोषणा केलेल्या जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे. तसेच सामाजिक आणि आर्थिक स्तरावरील घोषणांचा समावेश यामध्ये आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा घोषित केलेला असून आरक्षणाबाबतीत अनेक तरतुदींचा उल्लेख या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये समलैंगिक संबंधांना मान्यता देण्यापासून तर सर्व भारतीयांना 25 लाखांपर्यंत कॅशलेस विमा देण्यात येईपर्यंत अशा सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. काँग्रेसने लोकशाही मार्गाने काम करणारं सरकार निवडून द्यावं आणि लोकांनी प्रदेश, भाषा, जात याच्या पलीकडे जाऊन पहावं असे आवाहन काँग्रेसने केले आहे. तसेच आर्थिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावर काँग्रेस देशामध्ये जनगणना करेल व असे अश्वासन देण्यात आले आहे की जातीवर आधारित जनगणना केली जाईल.
तसेच काँगेस म्हणाले की ओबीसींसाठी आणि एससी, एसटीसाठी असलेल्या आरक्षणामध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करण्यासाठी कायदेशीर मार्गाने तरतूद करू. व काँग्रेसने आश्वासन दिले की,10 टक्के आरक्षण सर्व जाती आणि समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी नोकऱ्या, सरकारी संस्थांमध्ये कोणताही भेदभाव न करता दिलं जाईल. तसेच काँग्रेस प्रयत्नशील असेल संविधानाच्या संरक्षणासाठी, असे सांगितले गेले आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटलं आहे की, राजस्थान प्रमाणेच देशातील सर्व नागरिकांना 25 लाखांपर्यंत कॅशलेस विमा योजना सुरु केली जाईल. तसेच प्रत्येकाला राष्ट्रीय स्तरावर कमीतकमी रोज 400 उत्पन्न मिळेल. असे जाहीरनाम्यात काँग्रेसने नमूद केले आहे. व काँग्रेसने आश्वासन दिले की, विकास आणि नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी धोरणात्मक बदल आणि नवसंकल्पच्या माध्यमातून अर्थार्जनासाठी नवीन धोरणे तयार केली जातील.
कायदेशीर तरतूद आणि चर्चा नंतर समलैंगिक जोडीदारांच्या विवाहसंदर्भातील तरतुदींसाठी सकारात्मक निर्णय घेईल असंही जाहीरनाम्यात काँग्रेसने म्हंटले आहे. तसेच जे विद्यार्थी ओबीसी, एससी, एसटी आरक्षणाअंतर्गत येतात त्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करून परदेशी शिक्षणासाठी आर्थिक मदत एससी आणि एसटीमधील आरक्षित विद्यार्थ्यांना केली जाईल. काँगेसने म्हंटले आहे की, उद्योग सुरु करण्यासाठी आणि एससी, एसटी समाजातील घटकांना घरं बांधण्यासाठी संस्थांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल. असे आश्वासने काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत.