महिलेने फेकून मारलेली चप्पल साप घेऊन पळाला

Webdunia
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (10:47 IST)
सापाचं नाव ऐकल्यावर अंगाला थरकाप होतो. सध्या सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ शेअर केलेजात आहे. त्यात सापाशी खेळताना त्याचा मुका घेतानाचे व्हिडीओ असतात. पण सध्या सोशल मीडियावर सापाचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याला पाहून तुम्हाला हसू येईल. सापाला घराच्या पायऱ्यांवर पाहून एका महिलेने त्याला हाकलण्यासाठी आपली चप्पल फेकून मारली. असं केल्याने तो साप पळालाच नाही तर महिने फेकलेली चप्पल घेऊन पळाला. महिला सापाचा मागे ओरडतच बसली. हा व्हिडीओ कुठला आहे हे सांगता येणार नाही मात्र या घटनेचा व्हिडीओ आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केला आहे.  
<

I wonder what this snake will do with that chappal. He got no legs. Unknown location. pic.twitter.com/9oMzgzvUZd

— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) November 24, 2022 >
 
आता पर्यंत हजरो लोकांनी हा व्हिडीओ पहिला असून आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. 

संबंधित माहिती

पुढील लेख