काय सांगता, कोब्रा सापाला शाम्पूने आंघोळ घातली, व्हिडीओ पाहा

शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (10:54 IST)
सापाला शाम्पूने आंघोळ घालताना पाहिलं आहे का... तेही माणसाच्या हातातून? ऐकायला ही विचित्र वाटते  पण सध्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सांगतो की सापही आंघोळ करतात, तेही शाम्पूने. विश्वास बसत नाही न, या क्लिपमध्ये एक माणूस कोब्रा सापाला प्रेमाने आंघोळ घालताना दिसत आहे. तो प्रथम सापाला शॅम्पू लावतो, नंतर त्याला घासतो आणि त्याला आंघोळ घालतो. जसे पालक आपल्या मुलाला आंघोळ घालतात. त्यामुळेच हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. साप त्यांची त्वचा खराब झाल्यावर त्यांची त्वचा सोडतात. हे काम ते वर्षातून तीन ते चार वेळा करतात. असं केल्याने  सापाच्या अंगावर काही संसर्ग झाला तर तो जातो आणि त्वचाही स्वच्छ होते.
 
ही क्लिप 44 सेकंदाची असून यामध्ये साप आंघोळ घालत असल्याचे दिसत आहे. शॅम्पूच्या बाटलीतून अनेक वेळा शाम्पू घेऊन तो सापाच्या शरीराला चांगले घासतो. जसं आई आपल्या बाळाला चोळून आंघोळ घालते, यानंतर, मोठ्या काळजीने, तो सापावर पाणी ओतून शॅम्पू साफ करतो. आंघोळीच्या या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, नागाचा स्वभाव अतिशय शांत राहतो आणि स्वतःला पूर्णपणे त्या व्यक्तीसाठी समर्पित करतो. त्यामुळेच ही क्लिप पाहिल्यानंतर अनेकजण लिहित आहेत की, दोघांची मैत्री घट्ट आहे.
 हा व्हिडिओ मंगळवारी @DPrasanthNair ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - पहा साप आणि मानव यांच्यातील प्रेम. पार्श्वभूमीत एक मल्याळम चित्रपटाचे गाणे वाजत आहे. या क्लिप मध्ये आपल्या मुलाप्रमाणे एक माणूस सापाला अंघोळ घालत आहे. या क्लिपला आतापर्यंत आठ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि सुमारे 100 लाईक्स मिळाले आहेत. युजर्सनी कमेंटही केले  आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती