Coronavirus चॅलेंज: TikTok स्टारने चाटली विमानातील टॉयलेट सीट

Webdunia
बुधवार, 18 मार्च 2020 (13:23 IST)
करोना व्हायरसच्या या भयावह वातावरणात एका टिक-टॉक स्टारने अतिशय विचित्र काम केलं आहे. करोना विषाणूमुळे जिथे जगभरातील अनेक शहरे बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच सर्वांना सतत हात धुणे, स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला जात आहे. तेथे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे नेटकरी संतापले आहेत.
 
प्रसिद्धीसाठी व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतं है त्यातील एक उदाहरण म्हणावं. या व्हिडीमध्ये अमेरिकेतील फ्लोरिडा येथील मियामीमध्ये राहणारी Ava Louise नावाच्या 21 वर्षीय मुलीने चक्क विमानातील टॉयलेट चाटले आहे.
 
तिने सोशल मीडियावर करोना व्हायरस चॅलेंज’ असे म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती विमानातील टॉयलेट चाटताना दिसत आहे. तिने 15 मार्च रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता. तसेच विमानात टॉयलेटमध्ये कशी असते साफसफाई असे कॅप्शन दिले होते.
 

संबंधित माहिती

पुढील लेख