कोरोना व्हायरसमुळे हजारो जिवंत कोंबड्या गाडल्या

गुरूवार, 12 मार्च 2020 (11:58 IST)
चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस लागण होण्याची भीति असल्यामुळे चिकन प्रेमींनी याकडे पाठ फिरवली आहे. सध्याच्या परिस्थितीत चिकनचा खप कमी झाला असून चिकन स्वस्त किंमतीत देखील लोकं खरेदी करायला तयार नाही. 
 
अगदी कवडीमोल दराने कोंबडीची विक्री करावी लागत असूनही कुणी घेण्यास तयार होत नाहीये. अशा परिस्थितीत आता कोरोनाव्हायरसमुळे शेतकऱ्यांनी हजारो कोंबड्या जिवंत गाडल्या आहेत.
 
ही घटना कर्नाटकच्या बेळगाव आणि कोलार जिल्ह्यातील असून येथील शेतकऱ्यांनी आपल्या कोंबड्या जिवंत गाडल्याची बातमी आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
बेळगावच्या लोसुर गावातील शेतकर्‍याने तब्बल 6,500 कोंबड्यांना जिवंत गाडल्या आहे. व्हिडीओप्रमाणे त्याने ट्रकभर कोंबड्या खड्ड्यात टाकल्या. कोलारमधील मंगोडी गावातही अशीच घटना घडली आहे. तिथल्या एका शेतकऱ्याने 9,500 कोंबड्या जिवंत गाडल्यात, असं समजतं.
 
कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे लोकांनी चिकन खाणे सोडले असून यामुळे कुक्कुटपालनाचा खर्चही मिळत नाहीये. शिवाय कोंबड्यांना खाद्य पुरवून त्यांना जगवणंही परवडत नाहीये. त्यामुळे कोंबड्यांना जिवंत गाडण्याची वेळ आली आहे.
 
अशात कुक्कुटपालन व्यवसाय करणार्‍या तसेच पोल्ट्री उद्योगासमोर संकट उभे राहिले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती