तिबेटमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.९ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किलोमीटर खाली होता. यापूर्वी ७ जानेवारी २०२५ रोजी तिबेटमधील डिंगरी काउंटी (टिंगरी) येथे एक भयानक भूकंप झाला होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी होती. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने त्याची तीव्रता ७.१ इतकी असल्याचे वर्णन केले आहे.
तिबेटचा सर्वात मोठा भूकंप
तिबेट भूकंपांना अतिशय संवेदनशील आहे. तो हिमालय पर्वतरांगा आणि भारतीय प्लेटच्या टक्कर क्षेत्रात येतो. तिबेटने इतिहासात अनेक भयानक भूकंप पाहिले आहेत. १५ ऑगस्ट १९५० रोजी सर्वात मोठा भूकंप झाला होता, ज्याला आसाम-तिबेट भूकंप म्हणतात.