मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात झालेल्या भीषण बस अपघातात किमान ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अनेक भारतीयांसह ५४ प्रवासी होते. नायगारा फॉल्सहून न्यू यॉर्क शहरात परतणारी बस उलटल्याने ही घटना घडली. यामध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या अपघातात अनेक प्रवासी बसमधून खाली पडले, तर काही जण आत अडकले होते, ज्यांना बचाव पथकाने बाहेर काढले. अशी माहिती समोर आली आहे.