काय आहे व्हायरल-
व्हायरल पोस्टामध्ये लिहिले आहे की- “COVID-19 रुग्णांवर उपचार करणार्या जपानी डॉक्टरांचा आवश्यक सल्ला. सर्वांना हे सुनिश्चित करावे लागेल की आपलं तोंड आणि घसा ओलसर असावा, घशात कोरड पडू नये याची काळजी घ्यावी. प्रत्येक 15 मिनिटाला किमान एक घोट पाणी पीत राहावं. अशात व्हायरस आपल्या तोंडात पोहचलं असल्यास तरळ पदार्थामुळे पोटात निघून जाईल आणि पोटात अॅसिड व्हायरसला नष्ट करेल. आणि आपण नियमित पुरेसं पाणी पीत नसाल तर व्हायरस आपल्या विंडपाइप आणि नंतर फुफ्फुसात प्रवेश करू शकतो. हे अत्यंत धोकादायक आहे.
काय आहे सत्य-
व्हायरस पोस्ट भ्रामक असल्याचे आढळून येतं. WHO ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटहून ट्विट करत हा दावा नाकारला आहे की हायड्रेटेड राहणे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे, परंतू याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही याची खात्री घेता येत नाही.