आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, मुंबई, पुण्यात एकूण सहा जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या 6 जणांपैकी 4 जण मुंबई आणि 2 जण पुण्यातील रुग्णालयात आहेत. नांदेडमध्ये दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत चीनहून भारतात येणार्या 3,756 प्रवाशांची तपासणी करण्यात आली.