काय कुंभ मेळ्यात कंडोम वाटत आहे यूपी सरकार... जाणून घ्या खरं

प्रयागराज येथे 15 जानेवारी पासून सुरू झालेल्या कुंभ मेळ्याशी जुळलेली एक बातमी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. एका वृत्तपत्रातील कटिंगची हेडलाईन या प्रकारे आहे - ‘कुंभ मेळ्यात पाच लाख कंडोम वाटणार यूपी सरकार’. या बातमी लोकं हैराण झाले आणि याची कटिंग फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअॅपवर शेअर करत योगी आदित्यनाथ सरकारच्या या निर्णयाची आलोचना करत आहे.
 
काय आहे व्हायरल पेपर कटिंगमध्ये?
वृत्तपत्रात बातमी सूत्रांनी दिलेल्या माहितीवर प्रकाशित करण्यात आली आहे. यात लिहिले आहे की योगी सरकारने कुंभ दरम्यान कंडोम वाटण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानंतर घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने नाशिकमध्ये आयोजित झालेल्या कुंभ मेळ्यात 5 लाख 40 हजार कंडोम वाटले होते. त्यांच्या या निर्णयाची देखील आलोचना झाली होती.
 
काय आहे खरं?
सर्वात आधी ही बातमी उत्तर प्रदेश CMO च्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर शोधली, परंतू आम्हाला तेथे या संबंधित ट्विट दिसला नाही. नंतर व्हायरल कटिंगची हेडलाईन इंटरनेटवर सर्च केल्यावर कळलं की ही बातमी तर ‘आजाद सिपाही’ वृत्तपत्रातील आहे आणि ‘thevoices.in’ वेबसाइटने देखील ही बातमी प्रकाशित केली आहे. या व्यतिरिक्त कुठल्याही मोठ्या मीडिया हाउसने ही बातमी प्रकाशित केलेली नाही.
आम्ही तपास सुरू ठेवला आणि प्रयागराजच्या सीएमओ एके श्रीवास्तव यांच्याशी याबद्दल माहिती घेतली. एके श्रीवास्तव यांनी वेबदुनिया प्रतिनिधी अवनीश कुमार यांना सांगितले की आम्हाला सरकारकडून या प्रकाराचे कुठलेही निर्देश मिळालेले नाही. हे पूर्णपणे धार्मिक आयोजन आहे आणि या बातमीचे आम्ही पूर्णपणे खंडन करत आहोत.
 
एके श्रीवास्तव यांनी म्हटले की सोशल मीडिया वर व्हायरल होत असलेली ही बातमी खोटी आहे. दिशाभूल करणाऱ्या बातमी प्रकाशित करणार्‍यांविरुद्ध कारवाई केली जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती