कुंभ मेळ्याचा इतिहास

सोमवार, 14 जानेवारी 2019 (12:23 IST)
कुंभ मेळ्याचा इतिहास किमान 850 वर्ष जुना आहे. असे मानले जाते की आदि शंकराचार्य यांनी याची सुरुवात केली होती, पण काही कथेनुसार कुंभाची सुरुवात समुद्र मंथनाच्या आदिकाळापासून झाली होती.  
 
मंथनाहून निघालेल्या अमृताचे कलश हरिद्वार, अलाहाबाद, उज्जैन आणि नाशिकच्या जागेवर पडले होते, म्हणून या चार जागांवर कुंभ मेळा प्रत्येक तीन वर्षांनंतर लागतो.  12 वर्षांनंतर हा मेळा आपल्या पहिल्या जागेवर परत येतो.  
 
शास्त्रानुसार पृथ्वीचे एक वर्ष देवतांचा दिवस असतो, म्हणून प्रत्येक 12 वर्षात एका जागेवर परत कुंभाचे आयोजन करण्यात येते. देवतांचे 12 वर्ष पृथ्वी लोकच्या 144 वर्ष नंतर येतो. अशी मान्यता आहे की 144 वर्षांनंतर स्वर्गात देखील कुंभाचे आयोजन होते म्हणून त्या वर्षी पृथ्वीवर महाकुंभाचा आयोजन होतो. महाकुंभासाठी निर्धारित स्थान प्रयाग याला मानण्यात आला आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती