पुढचे काही तास महत्त्वाचे, राहुल गांधीचे ट्विट

गुरूवार, 23 मे 2019 (07:51 IST)
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास आता काही तासांचाच अवधी राहिला असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत. सावध राहा, असे आवाहन राहुल गांधींनी केले आहे. 
 
एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलेले अंदाज आणि ईव्हीएमवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. ''पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत.सतर्क आणि सावध राहा, घाबरू नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. खोट्या एक्झिट पोलच्या दुष्प्रचारामुळे निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा, मेहनत वाया जाणार नाही,'' असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती