निवडणूक आयोगाकडून विरोधकांना धक्का, शेवटी होणार VVPAT - EVM मोजणी

निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांची ती मागणी फेटाळून लावली ज्यात मतदान सुरू झाल्यानंतर आधी पाच व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी. तसंच फेरफार आढळल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील सर्व व्हीव्हीपॅटची मोजणी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. 
 
२२ विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने मागणी केली होती की जिथे शक्य आहे त्या मतदान केंद्रांवर ईव्हीएमच्या आधी व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी व्हावी. गुरुवारी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची पडताळणी करावी असं त्यांनी मागणीत म्हटलं होतं. पण निवडणूक आयोगाने बुधावरी ही मागणी फेटाळून लावली.
 
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आयोगाकडे मागणी केली होती. त्यात सांगितलं होतं की, विसंगती आढळ्यास सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची पडताळणी केली जावी.
 
यावर भाजपाने विरोधक पराभवाच्या भीतीने हे सर्व करत आहे अशी टीका देखील केली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती