निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस

गुरूवार, 2 मे 2019 (11:21 IST)
आदिवासींना मारणाऱ्या कायद्याबाबत केलेल्या वक्तव्या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.  
 
"नरेंद्र मोदी यांनी नवा कायदा केला आहे, ज्यानुसार पोलिसांना आदिवासींना गोळ्या घालण्याचा हक्क देण्यात आला आहे. सरकार आदिवासींची जमीन घेत आहे, त्यांचं जंगल ताब्यात घेत आहे, पाण्याचे स्रोत घेत आहेत आणि आता त्यांना मारण्याचा हक्क पोलिसांना देण्यात येत आहे," असं विधान राहुल यांनी केलं होतं. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
 
23 एप्रिलला शहाडोलमध्ये झालेल्या रॅलीत राहुल यांनी हे विधान केलं होतं.
 
नोटिशीला उत्तर देण्यासाठी राहुल यांना 48 तासांचा अवधी देण्यात आला आहे. दरम्यान राहुल यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती