सर्तक रहा, केंद्रीय गृहमंत्रालयाचा आदेश

गुरूवार, 23 मे 2019 (07:47 IST)
देशातील विविध भागात मतमोजणीवेळी हिंसाचार होण्याची माहिती गृहमंत्रालयाला मिळाली आहे. त्यामुळे सर्व राज्यातील मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले.
 
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळीच अनेक ठिकाणी हिंसाचार घडला होता. त्यामुळे निकालानंतरही हिंसाचाराची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय विरोधक ईव्हीएमविरोधात आक्रमक आहेत. बिहारमधील नेते उपेंद्र कुशवाह यांनी आपल्या बाजूने निकाल न आल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. शिवाय जाहीरपणे हिंसाचार करण्याची धमकीही दिली. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अलर्ट जारी केलाय.ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुम आणि मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घ्या, असे आदेशही देण्यात आले आहेत. स्ट्राँग रुमच्या काळजीबाबतही विशेष सूचना करण्यात आली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती