आयपीएल 2024 चा 18 वा सामना शुक्रवारी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या सामन्यात सीएसकेचा तिसरा विजय नोंदवण्याचा आणि हैदराबादचा दुसरा विजय नोंदवण्याचा प्रयत्न असेल. हैदराबादच्या या मैदानावर आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला गेला आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात पॅट कमिन्सच्या संघाने दमदार कामगिरी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली.
IPL 2024 चा 18 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शुक्रवार, 5 एप्रिल रोजी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07.30 वाजता होणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 07:00 वाजता होईल.