रोहित शर्माला 2011 मध्ये मुंबईने 9.2 कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट केले होते. रोहितने 201 सामन्यात 5110 धावा केल्या आहेत आणि तो बराच काळ संघाचा कर्णधार होता. असे असूनही, मुंबई फ्रँचायझीने 2024 च्या मोसमासाठी रोहितच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. संघाच्या या निर्णयाचे सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि त्याबाबत असंतोषही उफाळून आला. आता असे सांगितले जात आहे की, रोहित हार्दिकच्या कर्णधारपदावर नाराज असून तो मोठा निर्णय घेऊ शकतो. वृत्तानुसार, रोहित शर्मा पुढील हंगामात आपल्या संघात बदल करू शकतो.
सूत्राने पुढे सांगितले की, दोन्ही खेळाडूंमध्ये अनेक निर्णयांवर वाद होत आहेत, त्यामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगले नाही. मुंबईने आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत.