वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचे निधन, कुटुंबावर शोककळा

रविवार, 10 एप्रिल 2022 (15:29 IST)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या मुंबई इंडियन्स  विरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वेगवान गोलंदाज हर्षल पटेल यांच्या बहिणीचे अर्चिता पटेल यांचे निधन झाले. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. दरम्यान हर्षलला त्याचा घरी रवाना केले असून तो एक दिवसानंतर पुन्हा संघात सामील होणार आहे. 
 
रिपोर्ट्सनुसार, आरसीबी व्यवस्थापनाने त्याच्या बहिणीच्या मृत्यूची बातमी कळतातच तातडीने त्याच्या घरी जाण्याची व्यवस्था केली. बहिणीच्या अंत्यसंस्कार विधीत सहभागी झाल्यानंतर तो पुन्हा IPL 2022 मध्ये आपल्या संघात समाविष्ट होणार आहे. या मुळे हर्षलला आता बबल मध्ये परत येण्यासाठी क्वारंटाईन प्रक्रियेतून जावे लागणार.  
 
हर्षल ची लहान बहीण अर्चिता ही बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. शनिवारी दुहेरी हेडर च्या सामन्यात बंगळुरूच्या सामना मुंबई संघाशी झाला. दरम्यान हर्षलच्या बहिणीच्या मृत्यूची वार्ता समजली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती