आयपीएलमध्ये आज कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाची कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध खडतर कसोटी लागणार आहे. केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे आहे, ज्याने यापूर्वी दिल्लीचे नेतृत्व केले आहे. 2020 मध्ये दिल्लीला अंतिम फेरीत नेण्यात श्रेयसची महत्त्वाची भूमिका होती. गेल्या हंगामात दुखापतीमुळे तो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता, त्यानंतर पंतकडे कमान देण्यात आली होती. नंतर दिल्लीने त्याला संघात कायम ठेवले नाही आणि केकेआरने बोलीमध्ये त्याची निवड केली.
या हंगामात श्रेयसच्या नेतृत्वाखाली केकेआर चार सामन्यांतून सहा गुणांसह मजबूत स्थितीत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांचा आतापर्यंतचा एकमेव पराभव झाला आहे. दुसरीकडे दिल्लीच्या संघाने विजयाने सुरुवात केली, मात्र नंतर त्यांना दोन पराभवांना सामोरे जावे लागले
कोलकाता संघ श्रेयसच्या नेतृत्वाखाली संघ गोलंदाजीपासून फलंदाजी, क्षेत्ररक्षणापर्यंत प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करत आहे. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात ज्यात संघाचा पराभव झाला,
दिल्लीचे प्लेइंग 11
पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, रोवमन पॉवेल, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेट किपर), सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, एनरिक नॉर्टजे.
कोलकात्याचे प्लेइंग 11
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (विकेट किपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम, वरुण चक्रवर्ती.