चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (CSK) ला IPL 2022 च्या 17 व्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने हैदराबादसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे विल्यमसनच्या संघाने 17.4 षटकांत पूर्ण केले. हैदराबादचा तीन सामन्यांतील हा पहिला विजय आहे.
आयपीएल 2022 च्या 17 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा आठ गडी राखून पराभव केला. याहंगामातील गतविजेत्या सीएसकेचा हा सलग चौथा पराभव आहे. त्याचवेळी हैदराबादने मोसमातील पहिला सामना जिंकला. संघ तीन सामने खेळला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून 154 धावा करता आल्या. मोईन अलीने 48 धावा केल्या.
प्रत्युत्तरात हैदराबादने 17.4 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. SRH साठी अभिषेक शर्माने 50 चेंडूत सर्वाधिक 75 धावांची खेळी खेळली. राहुल त्रिपाठी 15चेंडूत 39 धावा करून नाबाद राहिला. या विजयासह सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे.